जनआंदोलने – साधीसरळ गुंतागुंत
महानदीवरील हिराकूड धरण संबळपूर विद्यापीठाच्या जवळ आहे. हिराकूड धरणप्रकल्पामुळे दीड लाख एकर जमीन ओलिताखाली आली. त्याशिवाय तेथे काही शे मेगावॉट विजेची निर्मिती होते. पण धरणाच्या परिसरातील आदिवासींच्या गावात वीज पोचलेली नाही. संबळपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने एका गावकऱ्याला ह्यासंबंधात छेडले. तर आदिवासी उत्तरला, “दिव्याखाली अंधार असतो.” पण त्या अंधारातही अवकाश असतो. तो दिसत नाही. विकासाची संकल्पना …